सोमवार, १३ जून, २०१६

paaNi vaachavaa

कधी अल्याड ग, कधी पल्याड ग,
चकवीत फिरती जणु मेघदूत ग,
संदेश कुणाचा कुणा सांगती
आम्हा सुखाचे वाटती सोबती
. थेंब थेंब अमृताचा जणू ,
कायेच्या अमुचा शहारील अणु
आजवरी थकली ती गाळुनी घर्मबिंदू
नव्या जोमाने होईल पुन्हा कामावरती रुजू .
मातीतुनीही  फुलेल आता हिरवे जीवन नवे
भरभरुनि  येतील आनंदाने गावे
थेंब एकही नका घालवू वाया
जपून साठवा  पिढीस पुढच्या ही देवाची माया
-----------कृष्णकुमार प्रधान 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा