मंगळवार, २१ मे, २०१३

शनिवार, १८ मे, २०१३

वसंत

आल्हाददायक वारे जेव्हां सुखविति मना
गुढि उभारुनि नववर्षाचे स्वागत करु या वाटे जना.
कोकिळ अपुल्या मंजुळ स्वरे जेव्हां बोलावितो तिला
तेव्हां समजावे धरणिवरति वसंत अवतरला 1

विचार करणे ठाउक नसते आम्हासारखे पक्ष्यांना
पण जाणिव कोठे तरि अंतरि सांगत असते त्यांना
हिच वेळ खरि समागमाचि, नातर होइल काय
अंङि घालण्या उशिर होइल,घरटे उसने मिळेल काय 2

मिळेल तरि ते असेल काउचे,पाउस पङता वहाणार
उघङ्यावरति पङता पिले आपुलि, माउतोंङि जाणार
हा दुरचा विचार जरि का आपणांस ना सुचणार
निसर्ग देतो जरि न बुद्धि,नेणिव पक्ष्या रुपणार